Home / seminar

seminar

दि 6 जून 2019 ला प्रवेश प्रक्रिया संबंधीत सेमिनार घेण्यात आले. यावेळी गतवर्षीच्या विविध शाखांना प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच यावर्षी 12वि मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी तहसीलदार श्री.पैलवाड साहेब, चवरे साहेब, प्रा.सोमवंशी, प्रा.भुरे, प्रा.केंद्रे, प्रा.आंडगे, प्रा.जनावार प्रतिष्टीत नागरिक श्री प्रवीण जनावार, श्री भूतनर, श्री साभाळकर, राजेश्वर भैरेवाड  तसेच पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात विविध प्रवेशा संदर्भात योग्य सल्ला केंद्र स्थापन केल्या बद्दल पालकांनी कौतुक केले आणि समाधानही व्यक्त केले. संचालक काशिनाथ गड्डमवार  आणि शैक्षणिक सल्लागार प्रा कागणे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.शैक्षणिक सल्लागार प्रा कागणे यांनी वैद्यकीय, इंजिनीरिंग, बी फार्मसी, डी फार्मसी, ऍग्री,बी वि एस सी इत्यादी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन केले. कु आस्था भूतनर हिने सूत्र संचलन केले. तर काशिनाथ गड्डमवार  यांनी आभार मानले.