मार्कण्डेय एजुकेशन
नमस्कार, आदरणीय पालकवर्ग आणि विदयार्थी मित्रांनो, नांदेड जिल्हहयातील आदिवाशी बहुल भागातील विदयार्थ्याच्या् हितासाठी आम्ही सुचक प्रयत्ने करीत आहोत. हिमायतनगर, किनवट, माहुर, हदगाव, भोकर आणि विदर्भातील उमरखेड या तालुक्या्तील विदयार्थ्याना इतर शाखांचे प्रवेश परीक्षा आवेदनपत्र भरणे आणि या शाखा मध्ये प्रवेश घेणेसाठी योग्य महाविदयालय निवड करण्यासाठी हजारो रुपये खर्च करुन जिल्हा पातळीवर जावे लागत होते. आजच्या धावपळीच्याा युगात ही बाब अतिशय खर्चिक आणि वेळ घेणारी आहे. परीणामी बरेच पालक आपल्याय मुलामुलींचे फॉर्मसुध्दा भरत नाहीत. शेकडो मुलेमुली उच्चे शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणुन आम्ही हिमायतनगर येथे “मार्कण्डेय एज्यु केशन कन्सलटन्सी ” सुरु केलेली आहे. सन 2017-23 वर्षी वेगवेगळया शाखेच्या जवळपास 2000 विदयार्थ्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली.
आपण ज्या कोर्सला अॅडमिशन घेणार आहोत? मेडिकल-[MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTh, BOTh, BASLP, BP&O, BSc (Nursing)] , इंजिनिअरिंग, बी.एस.सी (अॅग्री), वकीली (LLB), पॅरामेडीकल कोर्सेस (B.Pharm/D.Pharm) , इतर शाखा Veternary Science, Food Technology, Dairy Technology, ITI मधील (विविध कोर्सेस) यापैकी कोणत्या कोर्सला महत्व दयायचे? त्यामध्ये किती स्पर्धा परीक्षा आहेत ? कोणती कॉलेज सध्या टॉप आहे? प्रवेशासाठी कधी व किती फे-या होतात ?
कोणत्या कॉलेजची किती फिस आहे? निवडलेल्या कॉलजला मान्यता आहे कि नाही ? तसेच आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणकोणती? ई. प्रश्न आपल्याला भेडसावतात आणि मग पालकाची विनाकारण धावपळ होते. परीणामी मानसिकता भिघडते. या आणि अशा अडचणीवर मात करण्यासाठी वेळीवेळी माहिती व मार्गदर्शन मिळेल.
एस.एम.एस आणि कॉल अलर्ट तसेच वेळोवेळी मार्गदर्शक सेमिनारमुळे वेळेत योग्य निर्णय घेण्यास अत्यंत उपयुक्त अशी मदत होते. प्रवेश प्रक्रिया व त्याची माहिती मार्गदर्शक पुस्तकात सविस्तरपणे दिली आहे. परीक्षानंतर वेध लागतात ते निकालाचे. किती मार्क्स मिळतील? मेरीट नंबर काय असेल? प्रवेशाचे नविन नियम काय असतील? पुढील 4 वर्षानंतर त्या शाखेस महत्व असेल का? मागील वर्षाचे कॅटेगरीवाईज कटऑफ, कॉलेज फीस, शिट पोजिशन, विद्यार्थ्यासाठी चांगले कॉलेज, कमीत कमी किती मार्क्स प्रवेशासाठी लागतात ? उत्कृष्ट कॉलेज व विद्यापीठ मिळेल काय, असे एक ना अनेक हजारो प्रश्न पडत असतात. वरील सर्व प्रश्नानाचे अचूक उत्तर मिळण्यासाठी, आपणास एका उत्कुष्ट कार्य करणा-या कन्सलटन्सी मधूनच योग्य, परिपुर्ण मार्गदर्शन मिळते आणि हेच कार्य आम्ही करीत आहोत.
आज चांगल्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा असल्यास, मार्क्स कमी असल्यास लाखामध्ये डोनेशन म्हणून किंमत मोजावी लागते. पण योग्य मार्गदर्शन, योग्य निर्णय क्षमतेमुळे आपले हजारो रुपये वाचवु शकतो, आजपर्यत कित्येक पालक व विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घेतला आहे. रिजनल कोटा,मॅनेजमेंट कोटा, एन आर आय कोटा, इन्स्टिट्यूट लेवल कोटा हे काय असतात? मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांमध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांना कितीकिती शिट्स आहेत आणि यामध्ये अॅडमीशन कसे मिळेल? कॉलेजला एम.सी.आय.व डी.सी.आय. यांची मान्यता आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर “मार्कंडेय एज्युकेशन कन्सलटन्सी” मार्फत दिल्या जातात
या सर्व बाबींमध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे कॅप राउंड व त्यामधील ऑप्शन फॉर्म भरताना सर्व नियम समजूनच योग्य कॉलेज कोडचे ऑप्शन देणे जरुरीचे असते. तसेच कॉलेजची फीसही विचारात घेतली पाहिजे. दिलेले ऑप्शन्स आपल्यासाठी योग्य आहेत का ह्याची खात्री करून घ्यावी, ज्यामुळे भविष्यात आपल्याला आडचणीना समोर जाण्याची गरज भासणार नाही.
आपण अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यापासून बारावी पर्यंत, एम.एच.सीईटी, इंजिनीअरिंग, जेईई-मेन आणि इतर परीक्षा या कालावधीमध्ये जेवढ्या टेन्शनमध्ये होतात त्याही पेक्षा त्यांचे निकाल लागल्यानंतर थेट प्रवेश मिळेपर्यंतचा जवळपास चार महिण्याच्या काळात प्रचंड टेन्शनमध्ये राहतो. हे सर्व टाळण्यासाठी वेळेतच कन्सटन्सी मार्फत प्रवेश प्रक्रिया करून आपण निश्चिंत राहू शकतो .
इंजिनीअरिंग/मेडीकल (NEET )प्रवेश प्रक्रियेमधील सर्व महत्वाचे टप्पे
-
मागील वर्षाचे कट ऑफ कसे पाहावे ? प्रत्येक शाखेची प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
-
एकून उपलब्ध जागा व जागा वाटप. सर्व राउंडस ची पात्रता व नियमावली.
-
प्रेफरन्स फॉर्म / Option Form कसा भरावा? भरतांना घ्यावयाची काळजी.
-
मेरीट क्रमांकाचा व मागील वर्षाचा कटऑफ व मार्क्सचा आढावा.
-
कोणत्याही शाखेत पहिला प्रवेश घेतांना/सोडवतांना,दुसरा प्रवेश घेतांना घ्यावयाची काळजी.
-
प्रवेश प्रक्रियेचे बदललेले नियम तसेच सोबत लागणारी कागदपत्रे, दाखले.
-
शुल्करचना/सवलत/अनुदान/शिष्यवृत्ती आदी.