Home / ABOUT US

ABOUT US

“मार्कण्डेय एज्युकेशन कन्सलटन्सी”

यशस्वी,प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनाचा स्त्रोत

नमस्कार, आदरणीय पालकवर्ग आणि विदयार्थी मित्रांनो,

नांदेड जिल्हयातील आदिवाशी बहुल भागातील विदयार्थ्याच्या हितासाठी आम्ही सुचक प्रयत्न करीत आहोत. हिमायतनगर, किनवट, माहुर, हदगाव,भोकर आणि विदर्भातील उमरखेड या तालुक्यातील विदयार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरींग, वकील, बी.एससी (एग्री) या व इतर शाखांचे परीक्षा आवेदनपत्र भरणे आणि या शाखामध्ये प्रवेश घेणेसाठी योग्य महाविदयालय निवडणे यासाठी हजारो रुपये खर्च करुन जिल्हा च्या ठिकाणी जावे लागत होते. आजच्या धावपळीच्या युगात ही बाब अतिशय खर्चिक आणि वे‍ळ घेणारी आहे. परीणामी बरेच पालक आपल्याच मुलामुलींचे फॉर्मसुध्दा भरत नाहीत. शेकडो मुलेमुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणुन आम्ही हिमायतनगर येथे “मार्कण्डेय एज्युकेशन कन्सलटन्सी” सुरु केलेली आहे. सन 2017-18 वर्षी वेगवेगळया शाखेच्या जवळपास 300 विदया‍र्थ्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली.

आपल्या सेवेत www.markandeyeducation.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देऊन विविध रोजगार नोकरी संधींचे संकलित सेवा प्रदान करत आहोत. सदरील संकेतस्थळ हे आपणास नवीन नोकरीच्या अद्ययावत जाहिराती, तसेच उपलब्ध होणारे प्रवेशपत्र, विविध कटऑफ व नुकतेच जाहीर झालेले निकाल तात्काळ उपलब्ध करून देत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना जास्तीत जास्त नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरावे लागतात व भरपूर नोकरीविषयक जाहिराती संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित होतात. या संकेतस्थळावर जे उमेदवार स्वतःचे खाते उघडतील त्यांना त्यांच्या मोबईल नंबर वर अद्ययावत नोकरीविषयक जाहिरातींचे sms अगदी मोफत पाठविण्यात येणार आहेत.

जेव्हा आम्ही गुणवंत विदयार्थी ची  एक झलक पाहतो, तेव्हा आम्हाला असे आढळले आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीचे पर्याय निवडणे खूप सोयीस्कर होते. तथापि, आजकाल परिस्थिती त्यापासून खूप दूर आहे. आजच्या कट-गलेच्या स्पर्धात्मक वातावरणात केवळ इच्छा काम करत नाही. एखाद्याला नवीनतम परीक्षेच्या नमुन्यांविषयी जागरूक असले पाहिजे आणि यश मिळवण्याच्या मार्गासाठी योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील त्या करिता ग्रामीण विदयार्थी साठी ऑनलाईन सराव परीक्षा .

शेवटी एवढ सांगू इच्छितो की, सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळविणे हि एक कठीण समस्या आहे परंतू माहिती तंत्रज्ञानाचा व इंटरनेटचा वापर करून होईल तेवढी माहिती अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. उमेदवारांच्या नोकरी मिळविण्याच्या कार्यात तसेच पालकांच्या पाल्याच्या भविष्य निश्तितीच्या कार्यात मदत करून वाट मिळविण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.

"आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपण बाहेर पडाल."

आपला
काशिनाथ गंगाधर गड्डमवार