



ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र
नमस्कार, आदरणीय पालकवर्ग आणि विदयार्थी मित्रांनो,
प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान व ग्रामीण कौशल्य विकास मिशन या योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील तीस-या क्रमांकाचे TC199886 हिमायतनगर तालुका मध्ये
भारतातील नामवंत प्रशिक्षण संस्थामार्फत हिमायतनगर तालुका पातळीवरील प्रथमच घेऊन आलो आहोत मार्कण्डेय एजुकेशन तर्फे ग्रामीण कौशल्य विकास मिशन या केंद्राच्या द्वारे ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्गातील बेरोजगार युवक व युवतींना नामवंत प्रशिक्षण संस्था मधून विविध टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत आहे .या प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक व युवतींना शासकीय/ निमशासकीय रोजगाराच्या ( Placements ) विविध संधी उपलब्ध करून आत्मनिर्भय करण्यात येत आहे
ग्रामीण कौशल्य विकास योजना अतर्गत कॉम्पुटर रिलेटेड सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस प्रशिक्षण उपलब्ध
( मुद्दत : – एक वर्ष )
Domestic Data Entry Operator , Web Developer , Social Media Manager, Animator, Diploma Computer Application, Office Assistant या सारखे इतर अन्य ४५ सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध करून दिले आहे
- मोफत प्रशिक्षण करिता कोणते विध्यार्थी पात्र ?
दररोज एक तास ऑनलाईन मोफत प्रशिक्षण असल्या मुळे एक वेळेस केवळ दहा विध्यार्थी सराव करण्यासाठी सुविधा असल्या मुळे केवळ एक बॅच दहा विध्यार्थी नुसार दररोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यत यावेळे प्रमाणे मर्यदित विध्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यासाठी पात्र असतील व तसेच दररोज एक तास ऑनलाईन घेण्यासाठी पात्र झाले त्याच विद्यार्थ्यां करिता NEET, MHT-CET, JEE ऑनलाईन सर्व अप्लिकेशन व कॅप राउंड तसेच कॉलेज प्रवेश पर्यत मोफत प्रशिक्षण व आवेदन फार्म भरण्यास पात्र असलीत ई चलन वगळता .
नांदेड जिल्हयातील आदिवाशी बहुल भागातील विदयार्थ्याच्या हितासाठी आम्ही सुचक प्रयत्न करीत आहोत. हिमायतनगर, किनवट, माहुर, हदगाव, भोकर आणि विदर्भातील उमरखेड या तालुक्यातील विदयार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरींग, वकील, बी.एससी (अॅग्री) या व इतर शाखांचे परीक्षा आवेदनपत्र भरणे आणि या शाखामध्ये प्रवेश घेणेसाठी योग्य महाविदयालय निवडणे यासाठी हजारो रुपये खर्च करुन नांदेडला जावे लागत होते. आजच्या धावपळीच्या युगात ही बाब अतिशय खर्चिक आणि वेळ घेणारी आहे. परीणामी बरेच पालक आपल्या मुलामुलींचे फॉर्मसुध्दा भरत नाहीत. शेकडो मुलेमुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणुन आम्ही हिमायतनगर येथे “मार्कण्डेय एज्युकेशन कन्सलटन्सी” सुरु केलेली आहे. सन 2017-18 वर्षी वेगवेगळया शाखेच्या जवळपास 300 विदयार्थ्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली.
आपण ज्या कोर्सला अॅडमिशन घेणार आहोत? मेडिकल-[MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTh, BOTh, BASLP, BP&O, BSc (Nursing)] , इंजिनिअरिंग, बी.एस.सी (अॅग्री), वकीली (LLB), पॅरामेडीकल कोर्सेस (B.Pharm/D.Pharm) , इतर शाखा Veternary Science, Food Technology, Dairy Technology, ITI मधील (विविध कोर्सेस) यापैकी कोणत्या कोर्सला महत्व दयायचे? मत्यामध्ये किती स्पर्धा परीक्षा आहेत? कोणती कॉलेज सध्या टॉप आहेत? प्रवेशासाठी कधी व किती फे-या होतात? कोणत्या कॉलेजची किती फिस आहे? निवडलेल्या कॉलजला मान्यता आहे कि नाही ? तसेच आवश्यक लागणारी कागदपत्रे कोणकोणती? ई. प्रश्न आपल्याला भेडसावतात आणि मग पालकाची विनाकारण धावपळ होते. परीणामी मानसिकता भिघडते. या आणि अशा अडचणीवर मात करण्यासाठी वेळीवेळी माहिती व मार्गदर्शन मिळेल.
एस.एम.एस आणि कॉल अलर्ट तसेच वेळोवेळी मार्गदर्शक सेमिनारमुळे वेळेत योग्य निर्णय घेण्यास अत्यंत उपयुक्त अशी मदत होते. प्रवेश प्रक्रिया व त्याची माहिती मार्गदर्शक पुस्तकात सविस्तरपणे दिली आहे. परीक्षानंतर वेध लागतात ते निकालाचे. किती मार्क्स मिळतील? मेरीट नंबर काय असेल? प्रवेशाचे नविन नियम काय असतील? पुढील 4 वर्षानंतर त्या शाखेस महत्व असेल का? मागील वर्षाचे कॅटेगरीवाईज कटऑफ, कॉलेज फीस, शिट पोजिशन, विद्यार्थ्यासाठी चांगले कॉलेज, कमीत कमी किती मार्क्स प्रवेशासाठी लागतात ? उत्कृष्ट कॉलेज व विद्यापीठ मिळेल काय, असे एक ना अनेक हजारो प्रश्न पडत असतात. वरील सर्व प्रश्नानाचे अचूक उत्तर मिळण्यासाठी, आपणास एका उत्कुष्ट कार्य करणा-या कन्सलटन्सी मधूनच योग्य, परिपुर्ण मार्गदर्शन मिळते आणि हेच कार्य आम्ही करीत आहोत.
आज चांगल्या मेडिकल कॉलेजला प्रवेश घ्यायचा असल्यास, मार्क्स कमी असल्यास लाखामध्ये डोनेशन म्हणून किंमत मोजावी लागते. पण योग्य मार्गदर्शन, योग्य निर्णय क्षमतेमुळे आपले हजारो रुपये वाचवु शकतो, आजपर्यत कित्येक पालक व विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घेतला आहे. रिजनल कोटा,मॅनेजमेंट कोटा, एन आर आय कोटा, इन्स्टिट्यूट लेवल कोटा हे काय असतात? मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांमध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांना कितीकिती शिट्स आहेत आणि यामध्ये अॅडमीशन कसे मिळेल? कॉलेजला एम.सी.आय.व डी.सी.आय. यांची मान्यता आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तर “मार्कंडेय एज्युकेशन कन्सलटन्सी” मार्फत दिल्या जातात.
या सर्व बाबींमध्ये सर्वांत महत्वाचे म्हणजे कॅप राउंड व त्यामधील ऑप्शन फॉर्म भरताना सर्व नियम समजूनच योग्य कॉलेज कोडचे ऑप्शन देणे जरुरीचे असते. तसेच कॉलेजची फीसही विचारात घेतली पाहिजे. दिलेले ऑप्शन्स आपल्यासाठी योग्य आहेत का ह्याची खात्री करून घ्यावी, ज्यामुळे भविष्यात आपल्याला आडचणीना समोर जाण्याची गरज भासणार नाही.
आपण अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यापासून बारावी पर्यंत, एम.एच.सीईटी, इंजिनीअरिंग, जेईई-मेन आणि इतर परीक्षा या कालावधीमध्ये जेवढ्या टेन्शनमध्ये होतात त्याही पेक्षा त्यांचे निकाल लागल्यानंतर थेट प्रवेश मिळेपर्यंतचा जवळपास चार महिण्याच्या काळात प्रचंड टेन्शनमध्ये राहतो. हे सर्व टाळण्यासाठी वेळेतच कन्सटन्सी मार्फत प्रवेश प्रक्रिया करून आपण निश्चिंत राहू शकतो .
इंजिनीअरिंग/मेडीकल (NEET )प्रवेश प्रक्रियेमधील सर्व महत्वाचे टप्पे
मागील वर्षाचे कट ऑफ कसे पाहावे ? प्रत्येक शाखेची प्रवेश प्रक्रिया कशी असेल?
एकून उपलब्ध जागा व जागा वाटप. सर्व राउंडस ची पात्रता व नियमावली.
प्रेफरन्स फॉर्म / Option Form कसा भरावा? भरतांना घ्यावयाची काळजी.
मेरीट क्रमांकाचा व मागील वर्षाचा कटऑफ व मार्क्सचा आढावा.
कोणत्याही शाखेत पहिला प्रवेश घेतांना/सोडवतांना,दुसरा प्रवेश घेतांना घ्यावयाची काळजी.
प्रवेश प्रक्रियेचे बदललेले नियम तसेच सोबत लागणारी कागदपत्रे, दाखले.
शुल्करचना/सवलत/अनुदान/शिष्यवृत्ती आदी.
विशेषत: इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळाल्यावर कॉलेज प्लेसमेंट चे काय?
TFWS स्किम काय आहे? Scholarship/EBC स्किम काय आहे?
मार्क्स कमी असून चांगले कॉलेज/विद्यापीठ मिळू शकेल काय? असे एक ना अनेक प्रश्न मनाला भेडसावत असतात.
द्विधामनस्थितीतील विद्यार्थी व पालकांनो निराश होण्याचे कारण नाही. फॉर्म भरण्याच्या तारखा, फॉर्म भरताना येणा-या समस्या तसेच वेळोवेळी बदलणारे नियम हे एस.एम.एस/प्रिंट आउट देण्यात येईल. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन, ऑनलाईन अप्लिकेशन, ऑप्शन फॉर्म- Round First, Second, Third, upto collage admission पर्यंत भरून मिळेल. मागील वर्षापासून सतत विद्यार्थ्यासाठी प्रयत्नशील असणारी शहराच्या मध्यवर्ती भागातील “मार्कण्डेय एज्युकेशन कन्सलटन्सीची” साथ आपल्या सोबत असेल.
JEE-Main, IIT, NIT, BITS, VIT (Vellore) and MHT-CET, NEET सर्व प्रवेश प्रक्रियेचे मेरीट संकलित करून निकालाचे विश्लेषण .Engineering, Medical, Pharmacy, Diploma, Direct 2nd Year, Hotel Management, Business Management, Veterinary, BPTH, OTH, Agri, Food Technology, निकाला नंतरची प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शनासाठी नोंदणी सुरु होईल. तरी संबंधित विद्यार्थ्यानी दिलेल्या वेळेवर रजिस्ट्रेशन करून घ्यावे कारण मर्यादित रजिस्ट्रेशन ठेवलेले आहेत.First come first basic या तत्वावर नोंदणी होईल, तरी विद्यार्थी व पालकांनी यांची नोंद घ्यावी.
टीप :- प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत परिपुर्ण मार्गदर्शन दिले जाईल. तसेच नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका मोफत दिली जाईल.
तालुका पातळीवर एकमेव प्रशिक्षण ट्रेनिंग व मार्गदर्शन केंद्र
